उंबर (पंचवटी)

loading...

झाडाचे नाव:

उंबर

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

FICUSGLO MERATA

माहिती:

उंबर हे 12 ते 15 मीटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे. या झाडाखाली दत्त गुरूचे स्थान असते अशी लोकांची श्रध्दा आहे म्हणून या झाडाची पुजा केली जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. हे झाड 24 तास प्राणवायु हवेत सोडते. या झाडाचे फुल कधीच दिसत नाही. उंबर हेच या झाडाचे फुल आहे. हे फळ कापल्यावर फुलाचे सर्व अवयव दिसतात. या झाडाच्या सुकलेल्या काडया होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पाने, फुले, फळे गुरांना अतिशय आवडते. पक्षांना याचे फळ आवडते. उंबर हे झाड सुध्दा औषधीयुक्त आहे. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. सुर्यादयाच्या आधी झाडाला खरवडल्यास खोडातून जो चीक येतो त्या चिकात शित गुणांचा असल्याने दाहाचे क्षमन होते. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात. गालगंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तिव्रता कमी होते.