खैर (नक्षत्रवन)

loading...

झाडाचे नाव:

खैर

वृक्ष संबंधित नक्षत्र:

मृग

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

ACACIA CAFECHU

माहिती:

खैर वृक्ष 15 मीटर उंचीपर्यंत वाढणारा पानझडी, काटेरी वृक्ष आहे. या झाडाच्या कोवळ्या फांद्या पिंगट रंगाच्या असतात. जुन्या खोडाची साल करडी, खरखरीत असते. पाने संयुक्त असून पिसासारखी दोन भागात विभागलेली असतात खैराची फुले पिवळ्या रंगाची असतात त्यांना देठ नसतो. पानाच्या बगलेत किंवा कणसाच्या स्वरूपात पातळ सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. या शेंगामध्ये 3 ते 8 बिया असतात. खैराचे लाकुड कठीण आणि टिकाऊ असते. त्याला वाळवी लागत नाही. त्यामुळे त्याचा उपयोग लाकडी खांब, हत्यारे, अवजारे, बासरी, होडया इत्यादी वस्तु बनवण्यासाठी होतो.

खैराच्या झाडाच्या सालीपासून कात तयार करतात. खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दातांचे आरोग्य सुधारण्यसाठी तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार अमांश पोटात दुखणे इत्यादीसाठी काताची पुड आणि मध घेतात. अधिक वेळा लघवी येत असल्यास कातपुड वापरतात. काताचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशाच्या व्रणावरही कात उपयुक्त आहे. कात पाचक, रक्त रोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोन खैर असे दोन प्रकार आहे.