रुई (नवग्रह)

loading...

झाडाचे नाव:

रुई

वृक्ष संबंधित ग्रह:

सुर्य

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

CABTROPIS PROCERA

माहिती:

या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला ‘मंदार’ असेही नाव आहे. 
रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. रुईच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. रुई हा श्रावण नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे
चामखीळ, जास्त वाढलेले मांस, जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींची पाच अंगे जाळून पाण्यात भिजत ठेवून, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात.[१]पायात काटा/काचेचा बारीक तुकडा/कुसर गेले असता रुईचा चीक लावल्यावर ती जागा पिकत नाही व काटा लवकर व आपोआप बाहेर येतो.[२] रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही.