सिता अशोक (नक्षत्रवन)

loading...

झाडाचे नाव:

सिता अशोक

वृक्ष संबंधित नक्षत्र:

अनुराधा

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

SARACA INDICA

माहिती:

अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक. पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोकवगैरे प्रकार आहेत. हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची झुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात(शेंगेत) ४ ते ८ बिया असतात, पण पिकलेले बी एखादेच असते. बिया रुजायला फार वेळ लागतो अनेक बिया पेराव्यात तेव्हा त्यांतली एखादीच रुजते. त्यांतली चार रोपे ४-५ वर्षे सांभाळली की एखादा वृक्ष तयार होतो