सिसम आणि दुर्वा (राशिवन)

loading...

झाडाचे नाव:

सिसम आणि दुर्वा

वृक्ष संबंधित राशि:

सिसम आणि दुर्वा

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

DALBERGIA AND CYNODON DACTYLON BELOW

माहिती:

शिसम वृक्षाच्या लाकडाचा उपयोग फर्निचर बनविण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे लाकूड इमारत बांधणी, पेपर उद्योग, कोळसानिर्मिती आणि जळणासाठी वापरले जाते. शिसमची रोपे रोपवाटिकेमध्ये वाफ्यावर अथवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये तयार केली जातात. बियाणे पेरल्यानंतर आठ- दहा दिवसांनंतर उगवण्यास सुरवात होते. विसाव्या दिवसापर्यंत सर्व बियाणे उगवून येते. उगवणक्षमता 90 ते 96 टक्‍क्‍यांपर्यंत मिळते. बियाणे पेरण्यापूर्वी 24 तास गार पाण्यात ठेवून पेरल्यास उगवण एकसारखी व लवकर होते. याची योग्य पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास रोपे तयार करून चांगले व्यवस्थापन केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. या वृक्षाला मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली मानवते. लागवड 5 x 5 मीटर अंतराने 1 x 1 x 1 फूट आकाराचे खड्डे घेऊन करावी. लागवड करते वेळी मे महिन्यात खोदून ठेवलेले खड्डे भरताना जमिनीच्या वरच्या थरातील माती खड्ड्यात खाली टाकून वर पालापाचोळा, कंपोस्ट, शेणखत व माती याने खड्डे भरून, वर डोंब करून ठेवावा. पाऊस सुरू असताना जून- जुलै महिन्यात लागवड केल्यास झाडांची मर कमी होते. लागवड करताना एक वर्षाची रोपे वापरावीत. हे झाड भरभर वाढते, त्यामुळे विरळणी, फांद्यांची छाटणी नियमित करावी लागते
मराठी महिन्याची सुरूवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुडीपाडव्याला होते.त्या दिवशी गुडी उभी करताना कडूलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तसेच त्या झाडाच्य फुलांची मिरपूड,मीठ,गुळ घालून केलेली चटणी खावी,अशी प्रथा आहे.
कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने,काड्या वाटून,त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवरउपाय म्हणून काम करते, कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात.
कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो; सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.
रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगा मध्ये नीम अतिशय ऊपयुक्त आहे.यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करते. रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. बुद्धी तल्लख होते. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुल्व्याधी पोटातील कृमीवर कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन,पेस्ट यामध्ये पण कडूलिंबाचा वापर करतात