
झाडाचे नाव:
पळस
वृक्ष संबंधित नक्षत्र:
पुर्वा
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
BUTEA MONOSPEMA
माहिती:
पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड राहतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याचे पानाचा वापर होतो. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतुत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात, तर महाराष्ट्रात हिवाळ्याात (डिसेंबर-जानेवारी) फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३)या दिवशी याचे पत्रावळींचा वापर विदर्भात जरूर होतो. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात,
