
झाडाचे नाव:
पायर
वृक्ष संबंधित नक्षत्र:
उत्तरा
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
FICUS ARMOTTIANA
माहिती:
पायरी वृक्षाला पिंपरी व ृक्ष म्हणतात. पायरी वृक्षाची सावली अगदी दाट व थंड असते. म्हणून रस्त्याच्या बाजुने वड, चिंचेबरोबर पिंपरी वृक्ष लावतात. या वृक्षाची फळे पिंपळाच्या फळाप्रमाणे असतात. पिंपरी ची फळे खाण्यास चविष्ट असतात. पंचवल्कलात या वृक्षांची साल घेतात. व्रणनाशक असून योनिदोष, दाह, पित्त, कफ रक्तदोष, मंदोरोग मुच्र्छा, सुज, अतिसार या रोगावर हा वृक्ष उपयोगी आहे. उत्तरा नक्षत्रामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीने स्वत:चा वाढदिवसाच्या दिवशी तसेच गूरूपोर्णीमेच्या दिवशी या वृक्षांचे दान किंवा रोपन केल्यास त्याच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. या वृक्षाच्या संपर्कात आल्याने मानसीक ताण कमी होतो, उर्जा प्राप्त होते.
