सावर (नक्षत्रवन)

loading...

झाडाचे नाव:

सावर

वृक्ष संबंधित नक्षत्र:

जेष्ठा

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

BOMBAX CEIBA

माहिती:

सांवर किंवा काटेसांवर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. हे एक मोठे झाड असूनही याचे खोडास काटे असतात. हे काटे जनावरांच्या पाठ घासण्यापासून वाचण्यासाठी असावेत. झाडाचे खोड बघून असे वाटते की यापासून चांगले लाकूड मिळू शकेल. परंतु, याचे लाकूड फारच नरम असते. या झाडाचे खोड सरळ व उंच असते.५ पाकळ्यांची लाल फुले लागणारे हे झाड आहे. हिवाळ्यात याची पाने गळतात व वसंत ऋतूमध्ये नव्या पालवीपूर्वी याला आधी फुले येतात, व नंतर फळे. पिकलेल्या फळांमध्ये कापसासारखे तंतू असतात. यातून निघणारा कापूस हा साध्या कापसास पर्याय म्हणून वापरता येतो.तो अत्यंत मऊ असतो. या झाडापासून काडेपेट्या तयार केल्या जातात.