बकुळ (राशिवन)

loading...

झाडाचे नाव:

बकुळ

वृक्ष संबंधित राशि:

बकुळ

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

MIMUSOPS ELENGI

माहिती:

बकुळ वृक्ष 16 मीटर उंच वाढतो. त्याचा माथा घुमटाप्रमाणे असून साल जाड व गर्द तपकिरी अथवा काळसर असून त्यावर रेषा आणि चिरा असतात. फांद्या व डहाळयामध्ये पांढरट चिक असतो. पाने साधी, चमकदार हिरवी, एका आड एक गुळगुळीत अंडाकृती 5-12 से मी. लांब व 2-5 से.मी. रुंद असतात. फुले एप्रिलमध्ये येत असून ती सुगंधी असतात. फुले लहान पिवळसर पांढरी व तारकाकृती असून ती एकेकटी किंवा झुबक्याने येतात. फळ मोठं असून कच्चे असताना हिरवे, तर पिकल्यावर नारंगी-पिवळे होते. पिकलेली फळे मऊ व गोड असतात. फळात 1-3 मोठ्या बिया असतात. बकुळीच्या खोडाची साल तुरट असते. त्याचा काढा गुळण्या करण्यासाठी तसेच दातांच्या तक्रारींवर उपयोगी असतो. फुलांपासून मिळणारा सुंगधी पदार्थ अत्तरात तसेच तेलात मिसळतात. फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकं दुखी कमी होते. साल व फळे यापासून दंतधावन (टुथपेस्ट) बनवितात. ते हिरड्या व दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पिकलेल्या फळांचे मुरंबे किंवा लोणचे तयार करतात.