About Us
“ प्रयास” एक विचार आहे.
समाजासाठी निस्वार्थीपणे काहीतरी काम करण्याचा.
आणि हे करत असताना, हे काम मी माझ्या भल्यासाठी करतो आहे, कुणा दुसऱ्यासाठी नाही हा विचार मनामध्ये पक्का असणाऱ्या लोकांचा एक समूह म्हणजे “ प्रयास यवतमाळ.”
आणि म्हणूनच प्रयास यवतमाळ, हे नाव यवतमाळ शी संबंधित वाटत असले तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. या विचाराने प्रेरित झालेले प्रयासी संपूर्ण जगात या विचाराने काम करीत आहे.
अगदी तरुणपणात सामाजिक कार्याचा वसा घेतलेले डॉ अविनाश सावजी, प्रयास सेवांकुर संस्था अमरावती चे संस्थापक अध्यक्ष हे आमचे प्रेरणास्त्रोत, ज्यांनी आम्हाला हा आनंद मार्ग दाखविला, त्यावर चालण्याची शक्ती दिली व आजही ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
त्यांच्या प्रेरणेतून आम्ही पहिला नियोजनबद्ध, मासिक व प्रेरणादायी ” आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना ” हा स्वप्न वेड्या माणसांशी संवादाचा कार्यक्रम चालू केला एप्रिल 2014 पासून व तो सलग 40 महिने चालला. हा कार्यक्रम आमच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरला. त्यामुळेच आम्ही संवादा वरून कृती वर उडी मारून, निरनिराळे समाजाभिमुख प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले. काही कामात आलेले अपयश सुद्धा आमच्यासाठी दिशादर्शकच ठरले.
1. वृक्षारोपण कार्यक्रम
जाम रोड वरील वनविभागाच्या जागेवर 380 झाडे लावून संगोपन केले
गोधनी रोड वरील वनविभागाच्या जागेवर 300 झाडे लावून संगोपन केले
गोधनी रस्त्याच्या दुतर्फा फॅन्सी झाडे लावून त्यांना ट्री गार्ड लावून संगोपन केले,
शहरातील निरनिराळ्या भागात, शाळेच्या मैदानात व देवस्थानच्या जागेवर वृक्षारोपण व संगोपन केले.
2. मिशन डीप निळोणा.
3. जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती
निळोणा घरणा मध्ये येणारा गाळ रोखण्यासाठी जुने तुटलेले बंधारे दुरुस्त केले.
विधी महाविद्यालय यवतमाळ समोरच्या बंधाऱ्याची दुरुस्ती.
गोधनी गावाजवळील सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढून पाण्याचा साठा वाढविला.
4.रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प
5. मूठ धान्य पक्षांसाठी.
6.सीड बॉल्स तयार करणे व ते नियोजित ठिकाणी टाकणे.
7.प्लास्टिक नियोजन व कॅरी बॅग निर्मूलन अभियान.
8.वाचनालय
9.कोविड महामारीच्या पहिल्या टप्प्यात गरजूंना अन्नधान्य व आवश्यक गोष्टीच्या किट्स वाटप.
10.प्रयासवन
या सर्व प्रकल्पांची इत्यंभूत माहिती पुढे दिलेली आहे.
हि सर्व कामे यवतमाळ चे सर्व नागरिक, सरकारी अधिकारी, आमचे असंख्य मित्र व चाहते यांच्या सहकार्यानेच शक्य झालीत. त्यांचा ऋणनिर्देश करण्यास प्रयास यवतमाळ कधीच विसरणार नाही कारण या सर्वांच्या सहकार्यानेच, पर्यावरण रक्षणाचे काम सदैव चालु ठेवण्याचा विडा प्रयास यवतमाळ ने उचललेला आहे.
तर चला मित्रांनो सर्वजन एकत्र येऊन हे पर्यावरण रक्षनाचे काम करू, नवीन पिढीला जागृत करू, ज्यामुळे पुढच्या पिढीचे जगणे सुकर होईल.