जाई (नक्षत्रवन)

loading...

झाडाचे नाव:

जाई

वृक्ष संबंधित नक्षत्र:

हस्ता

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

JASMINUM GRANDIFLORUM

माहिती:

जाई हे एक प्रकारचे सुगंधी फूल असून तिच्या वेलीचा वेलवर्गीय कुळात समाविष्ट होतो. सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.

पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकारमानाच्या असतात.
जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात.

जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे या फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.