दुर्वा (नवग्रह)

loading...

झाडाचे नाव:

दुर्वा

वृक्ष संबंधित ग्रह:

राहू

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

CYNODEN DACTYLON

माहिती:

दूर्वा ही औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती वर्षभर उपलब्ध असते. पावसाळ्यात हीई मोठ्या प्रमाणावर उगवते. सप्टेंबर-ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी-मार्च या महिन्यात या वनस्पतीला फुले येतात.
दूर्वा ही शीतल गुणधर्माची वनस्पती आहे. उष्णतेमुळे नाकातून रक्त आल्यास नाकात दुर्वांचा रस पिळला जातो. त्वचेचे तेज वाढण्यासाठी दुर्वा वाटून लेप चेह-याला लावला जातो. मूत्र विकारांवर दूर्वारस उपयुक्त ठरतो. रक्तशुद्धीसाठी दूर्वारस पोटात घेतला जातो.
हिंदू धर्मात या वनस्पतीला धार्मिक विधींमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे.  गणपतीच्या पूजेत हिचा वापर करतात, कारण या गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते. दुर्वा वनस्पतीचा विवाह वडाच्या झाडाशी करण्याची परंपरा हिंदू जीवनशैलीत आहे.