
झाडाचे नाव:
सप्तपर्णी
वृक्ष संबंधित राशि:
सप्तपर्णी
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
ALSTONLA SCHOLORIS
माहिती:
सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. सदाहरित आणि आकर्षक ठेवण
ह्या वृक्ष्याच्या खोडाची साल कडवट तुरट असते. खोडाची साल आणि पाने विविध रोग, व्याधी बऱ्या करण्यासाठी आयुर्वेद, युनानी, सिद्ध इत्यादी परंपरागत औषधी पद्धतीत वापर केला जातो. आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णी खोडाची साल वापरली जाते. ही साल मलेरियातील तापासाठी उत्तम असते. मलेरिया या खोडाच्या सालीपासून बरा होत असल्याने या वृक्षास “इंडियन सिंकोना” असेही म्हणतात. खोडाची साल हगवण, जुलाब, मलेरियातील ताप, फीट, अस्थमा, कातडी विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी केला जातो. खोडाची साल दातदुखी, सांधेदुखी, मधुमेह यांवर आणि विषाणू प्रतिबंधक (ॲन्टी-वायरस) म्हणून वापरली जाते. खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो. या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यापैकी ३ मुख्य रासायनिक घटक Ditamine, Echitenine, Echitamine की जे अल्कलॉइड आहेत. त्यांचा वापर मलेरियावरील प्रसिद्ध औषध क्विनाईन चा पर्याय म्हणून केला जातो. क्विनाईन हे सिंकोना या वृक्षापासून प्राप्त केलं जाते. म्हणून सप्तपर्णी या वृक्षास “इंडियन सिंकोना” असेही म्हणतात.
