
झाडाचे नाव:
अडुळसा
वृक्ष संबंधित नक्षत्र:
अश्विन
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
JUSTICIA ADHATODA
माहिती:
अडुळसा ही अॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.पानांत वासिसाईन हे अल्कलोइद आणि अॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो. अडुळसा याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.यात पांढरा व काळा अशा दोनजाती आहेत.यास पांढरी फुले येतात. झाड सुमारे २.५ ते ३ मीटर उंच वाढते.
मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी आहे . पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गूणकारी आहे . वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माश्या , पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात
