आवळा (नक्षत्रवन)

loading...

झाडाचे नाव:

आवळा

वृक्ष संबंधित नक्षत्र:

भरणी

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

EMBLICA OFFICINALIS

माहिती:

आवळा हे तुरट व आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा त्रिफळा चूर्णात आणि च्यवनप्राशात केला जातो.
आवळा हा एक फळ देणारा वृक्ष आहे. हा २० फूट ते २५ फुटापर्यंत उंच वाढतो. आवळ्याची झाडे हिमालयाच्या पायथ्याशी आणि उर्वरित भरतखंडात अधिकांश रूपाने मिळतात. आवळ्याचे फूल घंटेच्या आकाराचे असते.

आवळा हा केसांच्या समस्यांवर गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे ‘आमला तेल’ बनवतात.
आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅंडी, आवळा लोणचे, आवळा मोरंबा, आवळेपाक, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. आवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.

आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये घ्कङ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.