जांभुळ (नक्षत्रवन)

loading...

झाडाचे नाव:

जांभुळ

वृक्ष संबंधित नक्षत्र:

रोहीणी

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

SYZYGIUM CUMINI

माहिती:

जांभूळ हा सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे म्हणुनच भारताला जंबुद्विप असे नाव आहें. याला उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.

जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे [१]. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे[२]. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो. जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे.