
झाडाचे नाव:
बांबु
वृक्ष संबंधित नक्षत्र:
पुनरवसू
वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:
BAMBUSA VULGARIS
माहिती:
बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदीक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. हा पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी-कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसेंदिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत. बांबू किती जुना आहे यावर त्याचा कठीणपणा अवलंबून असतो. तज्ज्ञांच्या मते ५ ते ६ वर्ष जुने बांबूचे पीक पुरेसे कठीण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे फ्लोअरिंग हे लाकडापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नसते.
