वड आणि दुर्वा (राशिवन)

loading...

झाडाचे नाव:

वड आणि दुर्वा

वृक्ष संबंधित राशि:

वड आणि दुर्वा

वैज्ञानिक पद्धतीने दिलेले नाव:

FLCUS BENGALENSIS AND CYNODON DACTYLON BELOW

माहिती:

हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला घ्न्यग्रोधङ असेही नाव आहे.
वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो
वड हे थंडगार सावली देणारे विशाल वृक्ष आहे. वडाच्या झाडाला ब्रम्हाजींचे निवासस्थान मानले जाते. या वृक्षापासून वात-कफ-पित्त संतूलीत केलेे जाते. धातु संबंधी रोगाच्या निवारणासाठी या झाडापासून बनविलेल्या औषधिचा उपयोग केला जातो. पर्यावरण संतुलनासाठी वडाचे झाड फार उपयोगी आहे. या झाडाला फळ आल्यानंतर पक्षी आणि ईतर जीवजंतूसाठी निरंतर भोजन उपलब्ध होते. या झाडावर पक्षांना घरटे करायला आवडते. या झाडामुळे वातावरण शुध्द होऊन मनुष्य, प्राणी स्वस्थ जिवन जगु शकतात.