पाणी फाउंडेशन - वॉटर कप स्पर्धा (बरबाडा व तासलोट)

स्पर्धेत उत्तम सहभाग
जलसंधारणाची गावसहभागातून कामे करून गावांना पाण्याचे दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी सलग २ वर्षे यवतमाळ तालुक्यातील बरबडा व कळंब तालुक्यातील तासलोट ही गावे दत्तक घेवून नियमितपणे ‘महाश्रमदानाचे’ आयोजन करून उल्लेखनीय कार्य करण्यात आले.

दोन्ही वर्ष ८ एप्रिल ते २३ मे या कालावधीत नियमित श्रमदानातून जी कामे करण्यात आली, त्यामुळे पाणी पातळी वाढुन संपूर्ण गावाला फायदा झाला.