प्रयासवन
Plantation of 10000 Trees in Yaavatmal

राष्ट्रीय वन नीती अधिनियम १९८८ नुसार सरकारने वनच्छादित क्षेत्राचे लक्ष्य साध्य करण्यासाठी NGO चे सहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचे धोरणा अवलंबिले आहे. त्यानुसार वनविभाग (म.रा.) प्रयास यवतमाळ व दिलास संस्था, घाटंजी यांचेत त्रिपक्षीय करार होऊन यवतमाळ शहरालगत २५ एकर वनजमिनीवर १० हजार वृक्षलागवडीचे लक्ष ठेवून ‘प्रयासवन’ निर्मितीची सुरूवात झाली.
यवतमाळ शहरालगत शाश्वत व निरोगी पर्यावरणाची परिस्थिती निर्माण करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे या उद्दिष्टांसोबतच सामाजिक संस्था, संघटना, नागरी समाजातील लोक यांच्या सहकार्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे.
या परिसरात ७० विविध प्रजातींची एकूण १० हजार वृक्षलागवड होत असून सर्वांच्या सहकार्यातून संवर्धनाची जबाबदारी प्रयास यवतमाळद्वारे पार पाडली जाणार आहे. स्थानिक जातींच्या विविध वृक्षांवर या परिसरात विविध पक्षांचा अधिवास असेल. याद्वारे पक्षांच्या अधिवासांचे रक्षण, जैवविविधतेचे संरक्षण, अन्नसाखळी अधिक बळकट करणे या दृष्टीने हा प्रकल्प पथदर्शी असेल.

दृष्टी आणि ध्येय

समविचारी नागरीकांचा एकत्रितपणे, निस्वार्थपणे, समाजाला, पुढच्या पिढिला नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करून पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा हा ध्यास म्हणजेच “प्रयास". 33 आम्ही निसर्ग संवर्धन व मानवी उत्थानात कार्य करण्यासाठी समर्पित आहोत

कार्यकारिणी

अध्यक्ष: डॉ. विजय कावलकर
उपाध्यक्ष : श्री. प्रशांत बनगिनवार
उपाध्यक्ष: डॉ. आलोक गुप्ता
सचिव : श्री. मंगेश खुणे
मार्गदर्शक : श्री. संदिप शिवरामवार, श्री. विजय देऊळकर, श्री. हेमंत बेलगमवार, श्री. सुरेश राठी, श्री. वसंत उपगनलावार,डॉ. अविनाश सावजी डॉ. अनिल पटेल, श्री. रघुनाथ कापर्ती, डॉ. प्रकाश नंदूरकर

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

■ प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ -२५ एकर (१० हेक्टर). ■ ७० जातींच्या १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प.

■ नक्षत्रवन, पंचवटीवन, राशीवन, नवग्रहवन निर्मिती.

औषधीयुक्त वनस्पतींची लागवड.

फुलपाखरांच्या प्रजनन व संवर्धनासाठी विशेष झाडांची लागवड.

पक्षी अधिवास व वावर वाढविण्यासाठी विशेष उपक्रम.

वृक्ष लागवडीचा घनदाट झाडी (मियावाकी) हा विशेष प्रयोग.

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी कार्यशाळा, सभा, संवाद कार्यशाळेचे आयोजन.

■ प्रकल्पात १७०० मीटर लांबीची फायर लाईन/भ्रमण मार्गिका (वॉकिंग ट्रॅक).

पक्ष्यांसाठी जंगली फळझाडांची लागवड.

सुलव्यवस्थापनाचे प्रयोग माती बंधारा, दगडी बंधारा, सिमेंट प्लग इ.

संपूर्ण प्रकल्पात ठिबक सिंचनाद्वारे वृक्षांना पाणी देण्याची व्यवस्था.

नक्षत्र वन

। २७ नक्षत्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या

२७ वृक्षाचा समूह.

॥ मध्यभागी चंद्रमा

SR.NONAKSHATRABOTANICAL NAMECOMMON NAMETOTAL NOSTREE IMAGES
1ASHWINIJusticia adhatodaAdulsa2m 25 nos 
2BHARANIEmblica ofcinalis (Cynodon dactylon below)Amala + Durva Below3m 11 nos 
3KARTHIKAFicusglomerata      (Cynodon dactylon below)Umbar + Durva Below4m 8 nos 
4ROHINISyzygium cumini (Cynodon dactylon below)Jamoon + Durva Below4m 8 nos 
5MRUGAAcacia   catechu (Cynodon dactylon below)Khair  + Durva Below4m 8 nos 
6AARDRASimarouba glauca (Cynodon dactylon below)Laxmitaru + Durva Below4m 8 nos 
SR.NONAKSHATRABOTANICAL NAMECOMMON NAMETOTAL NOSTREE IMAGES
7PUNARVASUBambusa vulgarisBamboo3m 11 nos 
8PUSHYA

Ficus religiosa

(Cynodon dactylon below)

Peepal + Durva Below4m 8 nos 
9AASHLESHACalophyllum inophyllum (Cynodon dactylon below)Undi4m 8 nos 
10MAGHAFicus benghalensis (Cynodon dactylon below)Vad   + Durva Below4m 8 nos 
11PURVAButea monosperma (Cynodon dactylon below)Palas + Durva Below4m 8 nos 
12UTTARAFicus  arnottiana (Cynodon dactylon below)Payar + Durva Below4m 8 nos 
SR.NONAKSHATRABOTANICAL NAMECOMMON NAMETOTAL NOSTREE IMAGES
13HASTAJasminum grandiorumJai0.45 m 350 nos 
14CHITRAAegle  marmelos (Cynodon dactylon below)Bel    + Durva Below3m 11 nos 
15SWATHITerminalia arjuna (Cynodon dactylon below)Arjun  + Durva Below4m c/c 8 nos 
16VISHAKA

Mesua ferrea

(Cynodon dactylon below)

Nagkeshar + Durva Below3m 11 nos 
17ANURADHA

Saracaindica

(Cynodon dactylon below)

sita ashok + Durva Below3m 11 nos 
18JESHTA

Bombax ceiba

(Cynodon dactylon below)

savar + Durva Below4m c/c 8 nos 
SR.NONAKSHATRABOTANICAL NAMECOMMON NAMETOTAL NOSTREE IMAGES
19MulaAcacia farnesiana (Cynodon dactylon below)

dev babhul

+

Durva Below

3m 11 nos 
20PURVA ASHADACalamus pseudotenuis (Cynodon dactylon below)vet3m 11 nos 
21UTTAR ASHADAArtocarpus heterophyllus (Cynodon dactylon below)jack fruit + Durva Below3m 11 nos 
22SHRAVANCalotropis gigantearui2m 25 nos 
23DHANISHTHAProsopis juliora (Cynodon dactylon below)shami3m 11 nos 
24SHATATARAKANeolamarckia cadamba (Cynodon dactylon below)kadamba + Durva Below4m 8 nos 
SR.NONAKSHATRABOTANICAL NAMECOMMON NAMETOTAL NOSTREE IMAGES
25PURVABHADRAPADAMangifera indica (Cynodon dactylon below)mango + Durva Below4m 8 nos 
26UTTRA BADRAPADAAzadirachta indica (Cynodon dactylon below)neem + Durva Below4m 8 nos 
27REVATHIMadhuca  indica (Cynodon dactylon below)moha + Durva Below4m 8 nos 

राशी वन

राशी तत्वानुसार १२ राशींचे १२ पवित्र वृक्षाची लागवड.

नवग्रह वन

नवग्रहांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नऊ पवित्र वृक्षांची लागवड.

 नवग्रह शांती संदर्भातील यज्ञ रत्नजडीत संबंधीत वृक्ष.

पंचवटी वन

■ पिंपळ, वड, बेल, आवळा व अशोक या पाच पवित्र वृक्षांचा समृह. ■ केंद्रस्थानी ध्यान साधना.

फुलपाखरू क्षेत्र

■ निसर्ग अधिक रम्य होतो रंगीबेरंगी फुलपाखरांचा अधिवास वाढल्याने. त्याकरीता फुलपाखरांचे प्रजनन आणि संवर्धन करीता विशेष क्षेत्र.